सुत्रधार कुठे हाय रं

सांग सरकारा, बोलं रं सायबा.
सांग तू आता रं.
मारेकऱ्याना पकडले त्यांचा सूत्रधार कुठे हाय रं..
मारेकऱ्याना पकडले त्याचा सूत्रधार कोण हाय रं.॥धृ ॥
आमचा नेता त्यांनी मारीला.
सहा वर्ष झाली हो त्याला
आमचा नेता त्यांनी मारीला.
गती नाही रं तपासाला.
सुपारी बहादर पकडून गमजा किती तू मारणार.
सूत्रधार तो मोकाट त्याला कधी पकडणार.
सांग सरकारा , बोल र सायबा
सांग तू आता रं....  ॥१॥
कॉम्रेड पानसरे आण्णाला
त्यांनी मारले कल बुर्गीला
अजून किती र बलीदान देणार
किती ते मारणारं
सूत्रधार तो मोकाट त्याला कधी पकडणार. .॥२॥
त्यांनी मारले विचारवंताना
पत्रकार गौरी लंकेशला
अजून किती ती नावं आहेत रं त्यांच्या गोळीवर
अजून किती ती नावं आहेत रं त्यांच्या बुलेटवर
सुत्रधार तो मोकाट त्याला कधि पकडणार.  ॥३॥
सनातनी मुजोर जाहला
विचारवंता धमकाऊ लागला.
म्हणतो कसा चूप कर तू नायतर दाभोळकर करणार. ॥४॥
तुझा दाभोळकर करणारं
सुत्रधार तो मोकाट त्याला कधी पकडणार.
सांग सरकारा बोल रं सायबा सांग तू आता रं
मारेकऱ्यांना पकडले त्याचा सूत्रधार कुठे हाय रं ॥धृ॥

गित- *सुत्रधार कुठे हाय रं*
गितकार- दिनेश मोरे- धुळे
गायक- शरदकुमार-धुळे

Comments

Popular posts from this blog

समतेच्या वाटेनं

युगायुगाची गुलामी चाल...

तिच्या बोलण्याचं ऐस..