Posts

Showing posts from March, 2020

आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे

आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे, - २ बाकी सारे आकार-उकार, होकार-नकार, - २ मागे पडत चाललेल्या स्टेशनासारखे, मागे-मागे जात जात, पुसट होत चालले आहेत, पुसत जावे ढगांचे आकार, आणि उरावं एकसाधं आभाळ, - २ तसा भूतकाळ.... त्याच्या छातीवर, गवताची हिरवीगार कुरणं, भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग, आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले, बानाकृतीतील बगळे,  आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे....  विसरत चाललोय, -२ नावेतून उतरताना आधारासाठी धरलेला हात, - २ विसरत चाललोय, होडीची मनोगते, सरोवराचे बहाने, व नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट, ती लाट तर तेव्हांच पुसली, मनातल्या इच्छेसारखी, -२ सरोवर मात्र अजूनही तिथेच -२  पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली -२ आता तर लाटा नव्हे, पाणी ही नवं आहे कदाचित - २ पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखताय सगळे, आता आठवताय, ते फक्त काळेभोर डोळे.... तुझ्याकडे...तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मीही हट्टी - २ माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी, चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे, अजूनही - २ थोडेसे शब्द... बरच...