Posts

Showing posts from June, 2025

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो ll काट्यावरुन जाता मागे न पाय घेऊ हसऱ्या कळ्याफुलांची स्वप्ने विणुन घेऊ ओसाड माळ आम्ही फुलवीत चाललो आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll आमुची सुखे निराळी विश्वात बिंबलेली दुःखात निर्मितीची स्फुर्ती उफाळलेली आमुचे भविष्य आम्ही घडवित चाललो आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll आले अपयश घाले पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमुच्या पराक्रमाचा प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll बदलार्थ वेचिती जे सर्वस्वही स्वःताचे ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll -अंनिस लोक रंगमंच