तिच्या बोलण्याचं ऐस..
तिच्या बोलण्याचं ऐस...
तिच्या बोलण्याचं ऐस, काय सांगाव तंतर,
मन मोहूनिया जाई, काय घालती मंतर ||1||
तिच बोलणं मधाळ, जशी श्रावणी बरसात,
मोर नाचावा बनात, तस हासणं गालात ||2||
तिच्या मोकळ्या केसात, सार चांदणं गुततं,
बट वाऱ्यान हालती, मन गुततं गुततं ||3||
तिच्या रुपाची उपमा, काय चांदाला देवावी,
सारी नजर गोठती, मन वळूनिया पाही ||4||
तिच्या सोंदर्याची कळी अशी मोर्चात खुलावी...
जातीअंताची घोषणा तिची मूठ वळावी...||5||
तिच्या कोमल कंठातून बॉम्ब बारुद निघावं.
लाल निळ्या ह्या ठिणग्या गाणं मुक्तिच फुलाव्ं...
लाल निळ्या ह्या ठिणग्या गाणं समतेच फुलाव्ं. ||6||
तिनं चाकोरी मोडूनं, नवा पायंडा पाडावा,
मला सोबती घेऊन, जिर्ण पहाड फोडावा ||7||
तिनं मालक शाहीचं, अस्स कंबरड मोडाव,
तिनं हूकम शाहीचं, अस्स कंबरड मोडाव,
तिंन हिटलर शाहीच, अस्स कंबरड मोडाव,
तिनं सैनिका सारखं, हाती हत्यार घेवावं
मानवमुक्तीच्या दिशेनं नाजूक पाऊलं पडावं ||8||
Comments
Post a Comment