आता उठवू सारे रान...

आता उठवू सारे रान
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कामकऱ्यांच्या राज्यासाठी
लावु पणाला प्राण

किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेऊन
पेटवतिल हे रान, पेटवतिल हे रानग्न

कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणारांची
उडवू दाणादाण, उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती गाती
स्वातंत्र्याचे गान, स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन कामकरी
मांडणार हो ठाण, मांडणार हो ठाण

आता उठवू सारे रान
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कामकऱ्यांच्या राज्यासाठी
लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण
- साने गुरुजी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

समतेच्या वाटेनं

युगायुगाची गुलामी चाल...

तिच्या बोलण्याचं ऐस..