समतेच्या वाटेनं
समतेच्या वाटेनं,
तू खणकावत पैंजण यावंतू यावं,
तू यावं, तू यावंबंधन तोडीत यावं... ||धृ||
तू खणकावत पैंजण यावंतू यावं,
तू यावं, तू यावंबंधन तोडीत यावं... ||धृ||
शेतात रानात, जिथं घामानं भिजली धरती
हिरव्या पिकांवरती, जिथं राघू हो डोलती
ऐसी या कष्टाची महती, गान कोकिळा बोलती,
त्या सरीसरीतून, घाम-अत्तर लेवून यावं
तू यावं, तू यावं...
हिरव्या पिकांवरती, जिथं राघू हो डोलती
ऐसी या कष्टाची महती, गान कोकिळा बोलती,
त्या सरीसरीतून, घाम-अत्तर लेवून यावं
तू यावं, तू यावं...
वाडे जातीपातीचे ज्यात माणसं कोंडली
ऐसे जबरी विष, पिढी पिढी हो पोळली,
हाडामासाची माणसं, कशी ना दिसली,
ऐसे जबरी विष, पिढी पिढी हो पोळली,
हाडामासाची माणसं, कशी ना दिसली,
माणसं माणसाला कशी परकी हो झाली,
वाडे जाती-पातीचे, तू तोडत फोडत यावं,
तू यावं, तू यावं...
वाडे जाती-पातीचे, तू तोडत फोडत यावं,
तू यावं, तू यावं...
अन्यायाविरुद्ध जिथं मुठी हो वळल्या
इवल्याशा या चिमण्या, जिथं घारीशी हो भिडल्या,
त्या युद्धभूमीतून, रक्तचंदन लेवून यावं,
तू यावं, तू यावंबंधन तोडीत यावं...
इवल्याशा या चिमण्या, जिथं घारीशी हो भिडल्या,
त्या युद्धभूमीतून, रक्तचंदन लेवून यावं,
तू यावं, तू यावंबंधन तोडीत यावं...
- शंतनू कांबळे
Khupch sundar
ReplyDeleteLovely 😍
ReplyDelete