डोळे तुमचे डोळे
डोळ तुमचे डोळे
तुमच्या डोळ्यांची मला भीती
खाली पाहून चालू किती ll धृ ll
आई-बापाची शिकवण मला
कधी डोळ्याला डोळा नाही दिला
तुमचे डोळे प्रश्न पुसती,
खाली पाहून चालू किती ll १ ll
मी कुमारी की श्रीमती
कि आहे सौभाग्यवती
मी कुणाच्या मालकीची
तुमचे डोळे प्रश्न पुसती,
खाली पाहून चालू किती ll २ ll
नाव सांगून भागत नाही
तुम्हा हवंय आडनावही,
या या आडनावात बाई....
साऱ्या लपल्या जातीपाती,
डोळे तुमचे डोळे,
तुमचे डोळे प्रश्न पुसती,
खाली पाहून चालू किती ll ३ ll
तुमच्या डोळ्यांच्या नजरांपाई ,
रस्त्यात बाईची अब्रू जाई,
हो डोळे तुमचे डोळे......
Comments
Post a Comment